Saturday, January 5, 2013

भारतीय संघाच्या मागील वाईट कामगिरीची कारणे

भारतीय संघाच्या मागील वाईट कामगिरीची कारणे मला खालीलप्रमाणे वाटत होती. १) द्रविड, लक्ष्मण, अनिल कुंबळे आणि सौरभ गांगुली यांचा आता अस्त झाला आहे. यांच्याकडे मिळून ५०० कसोटी सामन्यांचा अनुभव होता. हा संघ नवीन आहे. २) सेहवाग १० पैकी पूर्वी ३ वेळा खेळायचा आता एकदाच नीट खेळतो. पण तरीहि "तो असाच खेळतो, हाच त्याचा नैसर्गिक खेळ आहे, ज्या दिवशी तो खेळतो तेंव्हा सगळ्यांची दाणादाण उडवतो ...." असली वाक्ये सुनील गावस्कर सेहवाग वर टीका करण्या ऐवजी BCCI कडून पैसे घेऊन करतो. १०१ वी कसोटी खेळणारा सेहवाग शाळेतल्या मुलांसारखा बाद होतो. गेल्या काही वर्षांत अनुभवामुळे त्याच्यात झालेला मोठा बदल म्हणजे तो आता कमी धावा करून वारंवार बाद होतो. ३) आज जी जिद्द चेतेश्वर पुजारा दाखवतो तीच जिद्द गौतम गंभीर पदार्पणात दाखवत असे आता ते दिवस राहिले नाहीत चेतेश्वर चा गंभीर होणार नाही कशावरून? सलामी बोंबलली. ४) सचिनच्या कारकीर्दीचा फक्त संधिप्रकाश उरला आहे. खाजगीत साचूनही हे मान्य करेल ५) धोनी, विराट कोहली हे कसोटीच्या लायकीचे नाहीत. कसलेल्या फलंदासासाठी कसोटी म्हणजे ग्रेट अभिनेत्यासाठी नाटक. त्यात सगळी म्हणजे सगळी तयारी होते. अगदी IPL गाजवणारे मोठे फलंदाज किंव्हा गोलंदाजही कसोटी खेळणारे आहेत हे पाहिलं कि कसोटी क्रिकेटची महती लक्षात येईल. हे दोघं त्याच्या आसपासही नाहीत. रैना तर मुळीच नाही. ५) हरभजन चा खांदा गेलाय. १७ व्या वर्षापासून त्याने असामान्य सेवा दिली आहे. वय त्याला चुकणार नाही. ६) अश्विन ओझा ला अजून खूप प्रगती करायची आहे. ७) भारतीय खेळपट्ट्या झहीर साठी कधीच चांगल्या नव्हत्या. जे कापिलसाठी आव्हानात्मक होतं ते झहीर कडून अपेक्षित करणं इज टू मच. ८) ग्रॅम स्वान सार्वकालिक उत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. आणि मोन्ति पानिसर तर भारतीयाच आहे. त्यामुळे इंग्लिश फिरकी गोलंदाजी आपल्यापेक्षा उत्तम असू शकते आणि मुख्य म्हणजे आपली गोलंदाजी त्यामुळेच तेही चांगले खेळू शकतात हेच आपण स्वीकारू शकत नाही. ९) त्यांचे चेंडू हातभर वळतात आणि त्याच खेळपट्टीवर आपले चेंडू वितभर सोडा इंचभरही वळू शकत नाहीत हे माहित असूनही आपल्याला आखाडा हवा. १०) भारतीय संघ बाहेर जाऊन जिंकला आहे तर बाहेरचे संघही तेच करू शकतात. आता तंत्रज्ञान विकसित झालाय. प्रशिक्षण सुधारलंय, बॅडपेचं चा काळ कमी झालाय. पण ही कारणीमिमांसा मी इथेच थांबवली कारण मला BCCI आणि मिडियाच्या दिव्य ज्ञानापुढे नतमस्तक व्हावासं वाटलं. त्यांच्यामते खालील कारणं आहेत. १) सचिन संपलाय २) त्याच्या धावा होत नाहीयेत. ३) त्याचे पाय आता हलत नाहीत. ४) त्याचा फॉर्म गेलाय. ५) नाऊ हि इज ४० ६) तो निवृत्त होत नाहीये ७) त्याच्यामुळे नवीन खेळाडू अडलेत ८) त्याची नजर कमी झालीये. ९) त्याची शरीराची स्टाईल bat पकडण्याची बद्धत चुकीची आहे. (जसंकी म्हणूनच त्याने ३४००० धावा केल्या) इतिहासाकडून काही धडा घेतला नाही की असा होतं. मग तुम्ही इतिहास रचू शकत नाही. तुम्हाला कायम फक्त वर्तमानाला सामोरं जावं लागतं.

No comments:

Post a Comment