Wednesday, June 8, 2011

औरंगाबाद शहरात विचारमंथन

औरंगाबाद शहरात विचारमंथन
११ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात ७ कोटी लोकसंख्या पस्तिशीच्या आतली असेल. सुमारे साडे पाच कोटी लोकसंख्या तर पंचविशीत आहे. या सात कोटींपैकी किमान ३ कोटी लोकांना आकांक्षा असतील. त्यांच्या सरकारकडून काही अपेक्षाही असतील. आणि जर सरकार त्यांच्या अपेक्षांना उतरत नसेल तर? तरुणाईचा स्फोट विविध मार्गांनी होणे स्वाभाविक आहे.


असाच एक स्फोट काही दिवस औरंगाबाद शहरात अनुभवायला मिळाला. ती डांबरी फटाक्यातली माळ नव्हती. तो विजांचा लखलखाट होता. अप्रतिम मिडिया न्यूज नेटवर्क आयोजित महाराष्ट्राचा अप्रतिम महावक्ता ही स्पर्धा अनुभवायला मिळाली. ही स्पर्धा म्हणजे सरकारचा confidential रिपोर्ट होता. महान वक्त्यांच्या परंपरेला मनाचा मुजरा करत, सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा एकूण ३० विषयांवर तरुणाई बोलती झाली. जात, धर्म, (बोली) भाषा, पंथ, व्यवसाय, वैचारिक बैठक आर्थिक स्थिती केंव्हाच मागे पडले. खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा अनेक प्रांतांतून तरुण एकत्र आले. सगळी खदखद बाहेर पडली. यात मग गडचिरोली मध्ये वकिली व्यवसाय करणाऱ्या कविता मोहरकर असोत किंवा शिवचरित्रावर ओघवती व्याख्याने देणारा अफसर शेख असो, बाळासाहेब भारदेंचा वारसा सांगणारा सचिन पवार असो किंवा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत शिरणारे प्रदीप कांबळे असोत. एक एक हिरा अस्सल होता. महाराष्ट्रातल्या अनेक चळवळींचे वास्तव कळले. अनेक मुद्द्यांचा फोलपणा कळला. उभ्या महाराष्ट्राला शिवछत्रपती किती प्यारे आहेत हे तर समजलेच. पण त्याच्या खालोखाल उभा आडवा महाराष्ट्र बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल किती हळवा आहे आणि आत्मीयता राखून आहे हेही नव्याने समजले. (संत साहित्य कळले म्हणजे कोणी पांडुरंग होत नसतो, तसेच इतिहास वाचायला लागले म्हणजे पुरंदरे होता येत नाही). महाराष्ट्र म्हणजे कोणी भरकटलेली गर्दी नव्हे तर एक जिवंत विचारधन आहे. मुंबईसारख्या शहरात राहून ग्रामीण भागाबद्दल फार थोडी माहिती कळते. शेतकरी आत्महत्या करतात म्हणून गळा काढणारे अनेक विचारवंत असतात. पण जीवन पिसाळ नावाचा एक १८ वर्षांचा मुलगा शेतकऱ्यांनाच खडे बोल सुनावून गेला. अस्सल ग्रामीण ढंगात त्यांच्यातलाच एक जण त्यांना बोलतोय हे पाहून महात्मा फुल्यांचीच आठवण झाली. स्पर्धकांमध्ये वारकरी समुदायातले एक अनुयायीसुद्धा होते. स्वतः शेतकरी असल्याने त्यांनी कैफियती मांडल्याच. पण त्यावर तोडगेही सुचवले. या एकंदर विचार मंथनात शेतकऱ्याचा आसूड होता, रानातल्या कविता होत्या, मृदगंध होता, कळ्यांचे निश्वास होते, असंतोषाचे इंधन होते, तरुणाईच्या नावोन्मेशाचा हा जाहीरनामा होता. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’, हा प्रत्येकाचाच दृष्टीकोण होता. या महाराष्ट्राचे नशीब असे की तरुणाई असंतोषाला विचारांतून आणि वक्तृत्वातून वाट मोकळी करून देत्ये. याचाच अर्थ कुठेतरी अजून त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे. महाराष्ट्राचा विकास समतोल नाही. प्रगतीची केवळ बेटं तयार झालेली दिसतायत. २०२० साली भारतात जगात सर्वाधिक क्रयशक्ती असेल असेल हे मान्य. पण त्यांचा उपयोग झाला नाही तर हेच तरुण काय करतील याच विचारही करवत नाही. क्रांतीचा मार्ग बंदुकीच्या नळीतूनच जातो हे तत्वज्ञान भारतभरात रुजतंय. अशा वेळी जर असे विचारमंथन होत असेल तर त्याचे स्वागतच करायले हवे. या लेखाच्या माध्यमातून माझी ही विनंती आहे की हा विचारांचा यज्ञ जर पुढे जाणार असेल तर त्याला माध्यमांनीही पाठींबा द्यावा. न जाणो यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकरणालाही नवी विधायक दिशा मिळेल.

Wednesday, May 11, 2011

यु पी एस सी पूर्वपरीक्षेसाठी साठी काही सूचना

यु पी एस सी पूर्वपरीक्षेसाठी साठी काही सूचना

यु पी एस सी च्या नवीन प्रश्नपद्ध्तीबद्दल आपण जाणले आहेच. आता वेळ आली आहे प्रत्येक भागाला हात कसा घालायचा याची. गेल्याच वेळेस नमूद केल्याप्रमाणे आपण जरी हे भाग १ ते ७ क्रमांकाने पहिले तरी ते आपल्या सोयीसाठी होते हे लक्षात घ्यावे . परीक्षेत हे असेच येतील याची हमी नाही. त्यांचा क्रम व संख्या ठरविण्याचा अधिकार केंद्रीय लोकसेवा आयोगाचा आहे.

तरीही पुन्हा एकदा आपल्या सोयीसाठी म्हणून आपण विभागवारच विचार करू.

COMPREHENSION :
यात उताऱ्यावरून प्रश्नोत्तरे सोडवावी लागतात. आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकावरून असे दिसते की उतारा हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये येऊन शकतो. आपल्या आकलनाप्रमाणे भाषा निवडावी. या भागात विषयांना मर्यादा नाही. इतिहास, विज्ञान, अभियांत्रिकी, भूगोल, साहित्य, चालू घडामोडी, माहिती तंत्रज्ञान, संस्कृती तसेच अगदी स्थापत्यशास्त्र, कशाचीही हमी देता येत नाही. १ मार्क एक प्रश्न असे समीकरण असेल. यासाठी काही तयारी लागेल. सर्वप्रथम भाषेवर प्रचंड पकड लागेल. वाचनाची सवय व आवाका जबरदस्त लागेल. त्याचप्रमाणे म संपूर्ण एकाग्र करून उताऱ्याचे मोठे आकलन लागेल.

हे उतारे से हाताळावेत?
सर्वात पहिली खबरदारी म्हणजे उतारे वाचण्यात जास्त वेळ घालवू नये. याचे प्रमुख कारण असे की उतारा वाचून जर प्रश्न वाचला तर काहीच आकलन झाले नाही हे कळते. आणि तो उतारा पुन्हा एकदा वाचवा लागतो. कारण आपण त्याप्रकारे वाचन केलेलेच नसते आपण कायमच जनरल वाचन करतो. म्हणून कोणताही उतारा प्रथम वाचताना आपण अगोदर प्रश्न ध्यानात ठेवलेला कधी उत्तम. (हाच तो टिपिकल यु पी एस सी अभ्यास). म्हणून पहिला प्रश्न आणि मग वाचन हे सूत्र ध्यानात ठेवावे, (हो अगदी परीक्षेच्या वातावरणातसुद्धा). अगदीच जर जमत नसेल तर उताऱ्यावरून उभी नजर मारावी. आपल्याला कोणताही उतारा नजरेखालून घातल्यावर कळून येईल की सुरवात तर एकदम झोकात झाली आहे. मात्र उतारा मध्येच भरकटलेला आहे. म्हणजे कलकत्याहून धुळ्याला येणारी गाडी एकदम गोव्याला भोज्या करून आली आहे असे वाटेल. कारण मध्येच विषयाला फाटे फुटतात आणि नवीन नवीन उदाहरणे येत राहतात. सरतेशेवटी गाडी पुन्हा एकदा मूळपदावर येते आणि प्रवास झोकातच संपतो. (उतारा मोठा असतो तेंव्हा हे होते, लहान उताऱ्यात हे भरकटणे फार दिशाहीन होत नाही). एकूणच काही विशेष मर्म उलगडत नाही. मात्र प्रश्न आगोदर वाचला असेल तर ह्या गोष्टी होत नाहीत. तसेच वाचन अधिक नेमके आणि वेगवान होते. चकवा देणाऱ्या प्रश्नांना अधिक वेळ देता येतो. भाषेवर हुकुमत असल्यास प्रश्न कसा वळवला आहे ते अधिक समजेल. आणि यातून उतारा अधिक चांगल्या पद्धतीने उलगडतो ते वेगळेच.

मध्ये किंवा एक प्रश्न येईल तो म्हणजे उताऱ्याला समर्पक नाव काय द्याल?
उताऱ्याचा पहिला व शेवटचा परिच्छेद वाचला की हा प्रश्न उलगडतो (शेवटी गाडी कुठे पोहोचली आहे ते महत्वाचे.) अशा प्रश्नांना तेवढेच केले तरी चालू शकते. आपण आपले म्हणणे मांडताना हेच करीत असतो. आपण विषय मांडतो वेगवेगळ्या उदाहरणांतून तो सिद्ध करतो व पुन्हा एकदा समाप्ती करतो. परत परीक्षे मध्ये -ve मार्किंग असते. त्यामुळे चुकलेल्या प्रश्नांना मार्क जात असतात. त्यामुळे सगळे प्रश्न सोडवायचेच नसतात.

व्यक्तिगत संवाद कौशल्य:व्हो

व्याकरण आणि भाषेची उत्तम जाण याला पर्याय नाही. याकरण तर इतके पक्के हवे की प्रश्न विचारल्यावरच मनात उत्तर यायला हवे. काळ, त्याप्रमाणे बदलणारे वाक्य, बदलणारी क्रियापदाची रूपे, शब्दांच्या सर्व जाती, विरामचिन्हे, प्रथम पुरुष, द्वितीय व तृतीय पुरुष, एकवचन अनेकवचन, अगदी शब्दाच्या संदर्भाबरोबर बदलणारी spellings (उदा. reach rich तसेच break brake असे सारखे वाटणारे शब्द.) यांवर आधारित हा भाग असेल. गाळलेल्या जागा भर तसेच वाक्य पुरा करा अश्या स्वरूपाचे प्रश्न यात येतात. यात एक नमूद करायला हवे की मराठी व्याकरणाची साथ व त्यावर असलेली पकड यात उत्तम साथ देते कारण मराठी व्याकरणातल्या शब्दांच्या जाती इंग्रजीवरच आधारलेल्या आहेत. तसेच काळावर येणारे प्रश्नही मराठीशी साम्य असणारे आहेत. म्हणूनच मराठी माध्यमाची मुले हा भाग उत्तम सोडवतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

तर्कनिष्ठता.

तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या मुलांनाही गोंधळात टाकणारा हा प्रकार आहे असे म्हणता येईल. ५ W व १ H विचारणारा हा भाग आहे. ५ W म्हणजे WHO , WHAT , WHEN , WHERE , WHY व १ H म्हणजे HOW . यात एखादा ५ ओळींचा उतराही विचारला जाऊ शकतो. वैज्ञानिक प्रश्न (जे अगोदर क्वचित विचारले गेले आहेत) येऊ शकतात. व्यक्तींमधील नातेसंबंध (कोण कुणाचा कोण), कार्यकारणभाव (कारणीमिमांसा - REASONING ) यात येऊ शकते. यातही प्रश्नांचा आढावा घेतल्यास मग उतारा ध्यानात घेणे कधीही चांगले. शक्य तेंव्हा कागद व पेन्सिल वापरलेली बरी. पुन्हा यात विषयांची मर्यादा नसते. आगोदर उल्लेखिलेल्या विषयांपैकी कोणतेही प्रश्न असतील. समीकरणे, जोड्या व वेगवेगळी combinations विचारली जाऊ शकतात. अनेकदा दिलेल्या माहितीवरून एखादे कोष्टक तयार होते. वेळात वेळ काढून सरळ एखादे कोष्टक तयार करावे. त्यावरून माहिती चटकन मिळते व उत्तरे सोडवता येतात. मात्र कोष्टक तयार करायलासुद्धा एक पद्धत असते. म्हणून सराव करणे खूपच महत्वाचे आहे.

निर्णयक्षमता व समस्यानिवारण : तल्लख, बुद्धिमान, सचोटीचे व कर्तव्यदक्ष अधिकारी निवडण्यासाठी त्यांची अगदी ही म्हणजे अगदी पदार्पणातली कसोटी ठरावी. हा भाग महत्वाचा आहे. कमीत कमी वेळात हे प्रश्न सोडविण्याला महत्व आहे. अगदी अडचणीच्या गोष्टी विचारल्या जाऊन विद्यार्थ्याची विवेकबुद्धी कितपत शाबूत आहे हे बघितले जाईल. अधिकारी झाल्यावर ज्या ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागते त्यांची ही पायाभरणी म्हणूया. आयोगाचा अभ्यासक्रम व परीक्षापद्धती ही वास्तवतेशी निगडीत नाही असा जो आरोप गेली काही वर्षे होत होता त्याची परिणीती म्हणजे हा विभाग आहे असे म्हणता येईल. प्रश्न पुन्हा पुन्हा वाचावा लागला तरीही चालेल. पण उत्तर अचूक मिळण्यासाठी जागरूक वाचन जरुरीचे आहे. प्रश्न वाचूनच वाचन करावे. सोडवलेल्या प्रश्नांवर फार मनन करू नये.

या सर्व विभागांवरून एक गोष्ट लाखात घ्यावी की प्रश्न चालू घडामोडींवर सुद्धा विचारले जाऊ शकतात. मात्र त्यांची उत्तरे आपल्या साठवलेल्या ज्ञानावरून नव्हे तर उपलब्ध प्रश्नांवरूनच द्यायची असतात.

बुद्धिमापन. :भूमिती, बीजगणित, त्रेराशिके यावरून प्रश्न येऊ शकतात. गणितांची सूत्र लक्षात ठेवणे कधीही उपयोगी असते. अनेकदा गणिताशी वैर पत्करलेले असते. ते न ठेवल्यास उत्तम. सगळीच गणिते कठीण नसतात. काळ, काम, वेगाची गणिते, वये, भूमिती व त्यांवर आधारित प्रश्न, बीजगणित, probability, द्युतातल्या सोंगट्यावर आधारित गणिते, भूमितीय आकारांचे आकलन व त्याची अचूक उत्तरे यात असतील. ज्याला गणितात गती आहे त्याच्यासाठीही हा भाग आव्हानात्मक असतो. probability जरी असली तरी टी नेहमीच कठीण असते असे नाही व सर्वच प्रश्न त्यावर असत नाहीत. हे सांगायचे कारण असे की याच्याच धास्तीमुळे मुले गणिताला टाळतात.

परीक्षेत पाळायची काही तत्वे.

  1. पेपर पूर्ण बघावा. नंतर मोठे उतारे असू शकतात. त्यातून वेळेचे नियोजन करता येईल.
  2. मध्येच पेपर कठीण असतो. तेंव्हा घाबरून जाऊ नये. शांत राहावे. कारण पेपर्स च्या सिरीस वेगवेळ्या असतात. त्याप्रमाणे कठीणपणा मागे पुढे होतो.
  3. प्रसंगावधान ठेवावे. चित्त शांत ठेवावे.
  4. सुरवात कायम कठीण प्रशांनी होते असे आढळून आले आहे. पहिल्या २ ओव्हर्स मेडन गेल्यावरसुद्धा मोठी धावसंख्या उभारता येते.
  5. एकूणच यात आपल्याला हैराण करायचा डाव असतो हे लक्षात घ्यावे व त्याप्रमाणे पुढे जावे.

केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे

पुढच्या लेखापासून परीक्षेचा अधिक विस्ताराने व टप्या टप्याने अभ्यास करू.