Saturday, May 7, 2011

भारत, बिन लादेन आणि इस्लाम

भारत, बिन लादेन आणि इस्लाम

आपण थोडे चुकतोय. बिन लादेन दहशतवादी होता कबूल. पण अमेरिका हा काही जीवनदायी डॉक्टर नाही. बिन लादेन आपला शत्रू होता का?? जर तो अमेरिकेचा दुश्मन होता म्हणून तो आपला दुश्मन मानायचा का? त्याच्या प्राधान्यक्रमात भारत ६ व्या क्रमांकावर होता. म्हणून आपण बिन लादेन मेल्यावर जास्त आनंद करू नये. आणि त्याला जर कोणी श्रद्धांजली वाहत असेल तर त्याला अडवूही नये. आपला यातून काहीही फायदा नाही. त्यामुळे आपण अमेरिकेच्या जवळ जाणार नाही. आपला शत्रू आपल्या घरात आहे, आपल्या जेल मध्ये आहे (खरतर २). शेजारी देशात आहे. त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी.

मुसलमानांशी मैत्री दाखवायचा किंवा त्यांचा लांगुलचालन करण्यासाठी हे सांगायचं नाहीये. जगभरातल्या मुसलमानांच्या मनात अमेरिकेविषयी राग आहे तो त्याच्या इस्रायेल धोरणाबद्दल आहे. (त्याबद्दल नंतर) अफगाणिस्तान, इराक धोरणांबद्दल आहे. यात पाकिस्तानी मुसलमान येतात. पाकिस्तान्यांच्या (व जगभरातल्या मुसलमानांच्या) मनात शत्रू नंबर १ आहे अमेरिका. (त्यात वावगे काहीही नाही आणि तो आपला प्रश्नही नाही). शत्रू नंबर २ आहे इस्रायेल. (हे झालं धार्मिक शत्रुत्व). मग लागतो भारताचा नंबर. (प्रमुख राजकीय शत्रू, यावर त्यांचा अस्तित्व अवलंबून आहे. आणि हे गम्भीर आहे.) इतर जगभरातल्या मुसलमानांना भारताविषयी काहीही देणंघेणं नाही. त्याच्यापैकी अनेकांनी हिंदू मनुष्य उभ्या जन्मात बघितलेला नसतो. त्यामुळे हिंदूंचे प्रमुख शत्रू मुसलमान रंगवून त्याद्वारे अख्खं मुस्लीम जग भारताच्या विरुद्ध आहे असं रंगवलं जातं ते किती चुकीचं आहे हे लक्षात यावं. भारत आणि इराणचे संबंध दरायसच्या काळापासून आहेत. भारत इराण उर्जा संबंध केवळ पाकिस्तानने खो घातल्यामुळे अडले आहेत (geopoliticsची कृपा). भारत सौदीचे संबंध उत्तम आहेत. त्याशिवाय असंख्य भारतीय लोक (हो हिंदुसुद्धा) त्या देशात काम करतच नसते. अफगाणिस्तान मधल्या निवडणुका आपल्या निर्वाचन आयोगाच्या देखरेखीखाली पार पडल्या. तेथे शाळा, रस्ते, पूल, T V towers उभारायचं काम आपण करतोय. कतार, येमेन, ओमान, जोर्डन, अमिराती, दुबई, कुवेत या देशांत भारताला व भारतीयांना उत्तम स्थान आहे. (कारण त्यात त्यांना जबर फायदा आहे.) आणि हे सर्व संबंध आपण आपल्या देशातल्या मुस्लिमांना खुश ठेवण्यासाठी करत नाही. यात आपला तितकाच फायदा आहे. (सुरक्षा + आर्थिक वृद्धी + सार्वभौमत्व = राष्ट्रीय हित.) या सगळ्या देशातल्या नागरिकांचा प्रमुख शत्रू आहे अमेरिका. तरीही अमेरिकेचे संबंध त्याच्याशी उत्तम आहेत (इराण सोडून). आपण मात्र त्यांच्या नागरिकांनी शत्रू मानलं नसताना उगाच कशाला देखावा करायचा?

जगभरातले मुसलमान एकाचा जातकुळीतले आहेत असं दाखवायचा प्रयत्न होतो. मग असे असेल इतक्या देशांत मुसलमान का विभागले गेले आहेत? सोविएत युनियन फुटल्यावर अनेक देश वेगवेगळे झाले. पण मुस्लीम राष्ट्रेही एकमेकांपासून अलग झाली.

आपला फायदा आहे दाउदला धरण्यात. त्यात जर पाकिस्तान गुंतले आहे तर ती fight आपली आहे. अमेरिकेला जवळ करून आपला काडीचा फायदा नाही. अमेरिका त्यांचे हित बघेल, आपण आपलं बघायचं. आपल्या देशातल्या नागरिकांनी कोणाबद्दल काय बोलायचं हे आपण आपल्या देशाच्या संदर्भात ठरवायचं. अमेरिकेचा शत्रू तो आपला शत्रू असेल तर आपल्याला रशियाशी मैत्री तोडावी लागेल. बिन लादेन हा जणू भारतासाठी अमेरिके इतकाच महत्वाचा होता असं मानायची आपल्यात एक पद्धत आहे. त्याच्यापासून भारताला प्रचंड धोका होता हे रंगवायची स्पर्धा असते. ती किती उथळ आहे हे समजून घ्यायची गरज आहे.

भारत पाकिस्तान दहशतवाद आणि इस्लाम या सर्वांवर एकत्रित चर्चा नंतर.

No comments:

Post a Comment